कबूल आहे मला...
मी चुकलो...
पुन्हा पुन्हा.....तेच
नसेलही ठाऊक कुणाला...
का असा मी झालो...
का असा मी वागलो......
माहीत आहे मला
मी चुकलो....
कारण देता सगळेच म्हणे..
कारण देतो....
कोणा तेव्हा ना कळे....
असे मी का करतो....
मलाच उमगले मीच बदलले....
ज्याला त्याला तेच कळे....
मी चुकलो....
आज मजकडे काहीच नाही...
मी आज कोणीच नाही...
माझे अस्तित्व काहीच नाही....
मला जाणणारे कोणीच नाही...
नाही...नाही...नाही...
असे काहीच नाही.....
मी माझे अस्तित्व..स्वत: घडवेन...
पण ते म्हणतात...
मी चुकलो...
आता मला बोलू द्या...
तुम्हाला कळो न कळो...
मला माझं जीवन जगू द्या
त्यांना कळेल.....
माझं अस्तित्व....
मग म्हणू नका परत..
मी चुकलो..................................
- शशांक नवलकर १४-६-२०१०.
1 comment:
shashank chhanach re
Post a Comment