Tuesday, April 29, 2008

चित्रकार...मी तुझ्या प्रेमाचा



नाजूक असा तो स्पर्श
रात्र होती ती मिलनाची
थांबवले नव्हतेस तू मला
नाही थांबवू शकलो होतो मी तुला

प्रत्येक क्षण आता असतेस तू
मनातच काय ह्र्दयात वसतेस तू
एक झालो होतो आपण तेव्हा
बोल ना प्रिये...मला विसरशील का

चित्रकार आहे मी असा
वेडा रंग रंगांचा जसा
मोह मला नेई वाहून तुझ्या प्रेमरंगात
होशील ना माझ्या प्रेमरंगात....

सौंदर्यात हरवतो मी तुझ्या
जणू हरवतो मी चित्रात तुझ्या
रंगवले मी स्त्रीत्व तुझे ....
तव आठवले ते क्षण प्रेमाचे

रंगातूनही स्पर्श होतो मला
तुझ्या प्रीतीचा तुझ्या यौवनाचा
जेव्हा चढतो मला तुझा नशा
गुंग होतो मी प्रेमात तुझ्या

पाहतो तुज चित्राकडे
असते तुझे अस्तित्वच खडे
न बोलवे काही तुज पाहता
तुला पाहतच राहावे.... तुला पाहतच राहावे

Wednesday, April 23, 2008

सखे मला माफ करशील ना...


जेव्हा त्याच्याकडून चूक घडते व त्याची शिक्षा तिला भोगावी लागते तेव्हा त्याने लिहीलीली ही कविता
माझ्या शब्दात......

सखे मला माफ करशील ना...

तू नव्हतीस काल परवा
होतो मी कसा एकटाच
पण भेटलीस जेव्हा त्या दिवशी
कळलेच नाही आपली मैत्री अशी जमली

कधीच कोण माझ्याशी बोलले
जेवढे जवळचे सर्व लांबच गेले
पण तू होतीस मला अनोळखीच
अन पटकन मज तू आपलेसे केले...

पाहीली होती मी तुझ्यात प्रेयसी
पण नशीबच म्हणते ती नाही तुझी
मैत्रीचं नातं जगावं कस...शिकावे फक्त तुझ्याकडून
कारण आहेसच तू माझी लाडकी सखी

काल तुला माझ्यामुळे पडला मार
आली माझ्या डोळ्यात अश्रुची धार
जर तुझ्याजागी असतो मी तिथे
तर हसत हसत खाल्ला असता तुझ्या वाटणीचा मार

आज मी एकटा आहे
पण तू आहेस..एका सावलीसारखी
माझ्यासाठी कोणीच नाही
पण तू आहेस...माझी लाडकी सखी...

Sunday, April 20, 2008

राणी...


अंधारातही तेजस्वीनी तू
प्रेमातही मज प्रेयसी तू
तुझ्या प्रजेची सम्राज्ञी तू
तुझ्याच राज्यातली एक राणी तू

कधी ना थांबलीस आयुष्यात तू
प्रेमळ आहेस सुंदर आहेस
कोण आहेस तू
मनातील...ह्र्दयातील....राणी आहेस तू

जीव लावतेस जीवासाठी तू
जगते आहेस जगणाय्रांसाठी तू
अंधारातही उजेड पाडतेस..तारकाच तू
सखे तुझसारखी कोणीच नाही..खरच कोण आहेस तू..

हसणे तुझं घेई मज जीव
तुज नजरा मज करती घायाळ
तुझसाठी मज सर्वस्व करतो मी अर्पण...पण..
स्वत:च्याच जगाची स्वामिनी तू..खरच एक राणी आहेस तू

Thursday, April 17, 2008

प्रेमा...तुझा रंग कसा



तुझ्या त्या निलस नजरांतून
मज पाहतेस तू जेव्हा
जणू त्या निळाशार सागरात..
तुझसवे विलीन व्हावे..

तुझ्या तेजपुर्ण शरीराकडे पहावे...निरखून
यावे तुज कवेत व गुरफटून जावे
त्या गुलाबी ओठांवर ओठ टेकावेत
तू लाजावेस व यावे मज मिठीत...

अंधारातही तेजस्वीनी तू
मज स्वप्नांतील मानिनी तू
नाव तुज आहेत आज अमाप
सांगशील प्रिये तुझ प्रेमाचा रंग कसा...

प्रेमात तुझ्या अनेक रंग
जाहलो मी असा गुंग
ना सोडवे तुझा मज लळा
सांग प्रेमा....तुझा रंग कसा

Tuesday, April 15, 2008

ओळखशील का....


प्रत्येक खेळात पहीली तू दुसरा मी...
जिंकायचे होते तुला
जिंकलेले बघायचे होते मला..
जेती आहेस सर्वत्र आज...मला तू ओळखशील का...

खेळात मी हरलो...हताश झालो
जवळ यायचीस तू...व टेकायचीस तुझे ओठ
लहानच होतो आपण..
आठवणींत त्या तू मज ओळखशील का...

पहायचे होते तुला उडताना आकाशात
गच्चीतून पतंग उडवताना...
आज तू घेते आहेस उंच भरारी...ह्या जगात
पाहतो मे तुजला ह्या उंच आकाशात...ओळखशील का...

लहान हसता हसता टेकलेस तु तुझे ओठ
व मी सुद्धा मारली तुला मिठी
पण तेव्हा कुठे कळत होते काय असते प्रेम...
पण आज आहे माझे तुझ्यावर प्रेम....ओळखशील का...

Sunday, April 13, 2008

आयुष्याचे झाड



कोणी का राहीलं नाही एकटे
विचार करतो मी का असा
जेव्हा असतात सर्व इथे तिथे
सर्वच जर आहेत इथे...तर का मी असा एकटा

एकटा...एकटा...एकटा पुरे झाले...
नाही करी मी आता तो विचार
न जगावी ती दु:ख जगावे फक्त ती सु:खं
आयुष्यातील दु:खी झाड खुंटून टाकावीत

मनात येती आयुष्याचे झाड...
वाढवले मी कित्येक वर्षे
ना कधी थांबले वाढणे..पण...
पण त्या झाडाकडे कोणीच पाहिले नाही

झाडं बनली वारा देण्यासाठी
पण मज हे आयुष्याचे झाड...
नाही कधी थांबले ना कधी झडले
नाही पाहत इथे कोणी तर थांबू नये वाढत जावे

साधीसुधी म्हणच आहे बुवा...
झाडे लावा झाडे जगवा...
आयुष्याचे झाड आपले जगवा..
पालव्या फुलतील सु:खाच्या
त्यांना कधीच खुंटू नका देऊ

Wednesday, April 9, 2008

मी एक कटपुतली



अनेक धाग्यांनी गुंफलेली
दुसय्राच्या हातानी बंधलेली
मुक भावनांनी भरलेली
अशीच मी एक कटपुतली

नाचते मी त्याच्या तालावर
बोलते मी त्याच्या बोलावर
ना फुलती हास्य ना पाझरती अश्रू
म्रुत असून जगणारी मी एक कटपुतली

ना मज होती वेदना
नाहीत मज त्या भावना
त्याच्या हातीच माझी चावी
त्यानेच चालणारी...मी एक कटपुतली

ज्याच्या तालावर केला नाच
त्यानेच केला माझा नाश
फेकून दिले अंधारात तव
सुरू झाला पुन्हा तो खेळ

कधी हा नाच ना थांबवती
अशी मी एक कटपुतली...

- शशांक

Sunday, April 6, 2008

ही स्पंदनं फक्त तुझ्याचसाठी


प्रेम केले मी तुजवर
भावना अर्पिल्या तुजवर
न काही ठेवले माझ्यासाठी
सारी स्पंदन फक्त तुझ्याचसाठी

खेळत राहीलो एकटाच मी
तुझा खेळ सावल्यांचा
पण खेळ मी सुद्धा खेळलो
ह्र्दयाच्या ह्या खेळात...माझी स्पंदन फक्त तुझ्याचसाठी

कोणी नसावे त्या ह्रदयात
असावीस फक्त तू तिथे
तुझं ह्र्दय असावे मजसाठी
माझ सर्वस्व फक्त तुझ्याचसाठी

तुझ्यानेच उगवावा मज दिस
तुझ्यानेच संपावी मज रात्र
असावे एखादे जग जिथे
असावे तू माझ्यासाठी व मी फक्त तुझ्याचसाठी...

तुझे श्वास आहेत माझ्यासाठी
माझा सहवास आहे तुझ्यासाठी
तुझे ह्र्दय आहे माझ्यासाठी व माझे तुझ्याचसाठी
आहेत ही सारी स्पंदनं....फक्त तुझ्याचसाठी..