Sunday, January 31, 2010

शेकोटी...

एक ठिणगी
आयुष्य बदलू पाहते...
ऐकले होते....
वणवा पेटला की
सर्वत्र आग पसरते
पाहिले होते....
पण एक शेकोटी........
दोन आयुष्यांना भस्म करून जाते
कधी ऐकलय का ?
ती शेकोटी तशीच होती...
जळत होती मंद ज्वालांसकट....
अन राख वाढली होती आता...
कोणास ठाऊक...
त्या दोघांचा अंत...
किती आग लाऊन गेला............
पण ती आग लागली होती
शेकोटीपासून शेकोटीपर्यंत.........
हो.....पण त्या दोघांच्या भस्माने...
भरपूर ठिकाणी वणवा पेटला...
अनेक बदल घडवून गेला
जणू त्यांचे क्षितिज
अनाहूतपणे एक झाले होते....
अन ते दोघेही
आज त्या क्षितिजापार आहेत.....................
पुन्हा असे कोणी होईल का ?
एक नवे क्षितिज गाठण्यासाठी...........
असेल का तीच शेकोटी.....!!
तो पर्यंत जळत........................?

- शशांक नवलकर १९-१-१०

No comments: