Tuesday, September 29, 2009

माणसांच जंगल



माणसांच्या गर्दीत माणसं एकटीच
माणसांचा शोध घेणारी तीच
अन स्वत:चा शोध घेणारीही....
तीच

जगण्याचा शोध घेता घेता
जगणे विसरून जीव घेता
माणूस म्हणवूनी
माणूसकीचाच जीव घेता

प्रत्येक माणूस हा माणसासाठीच
प्रेमासाठी क्लेशासाठी आनंदासाठी
अगदी पोटापाण्यासाठीही....!
फक्त माणूसच

आज म्हणे
माणसासारखा माणूस उगवला
जीता नव्हे तर डागडूजीतला
मानव उमगला....

पण माणूस म्हणजे माणूसच
श्वासासाठी श्वास देणारा
रक्तासाठी रक्त देणारा
शेवटी .... तो एक माणूसच

माणसांचेही एक जंगल असते ?
हो ..
जिथे माणसंच माणसं असतात
ह्या माणसाच्या गर्दीत मी ही असतो
एकटाच असतो...........
ती माणसंही आपापल्यासाठी
एकटीच असतात का?

- शशांक नवलकर २७-०९-२००९

No comments: