Friday, September 3, 2010

एक कविता....तुझ्यासाठी

dedicated to my best friend

बोलता बोलता तुझाशी.
इतकी हरवून गेले..
काळ खूप लोटला तरी...
कालच भेट झाली असे वाटले

प्रेम केले तुझ्यावर अनाहूतपणे...
केलेच का करतेच आहे
करतही राहीन....जन्मोजन्मी..
.
.
मग तू का नाही करत निमुटपणे...

आपले नाते असेच आहे का ?
तू म्हणतोस या राजाला राणी हवी...
शोध तिला माझ्यासाठी...
शोधणे इतके काही सोपे आहे का ?

राणी शोधणे कठीण आहे बुवा....
त्या पेक्षा तूच माझी राणी हो
बघा म्हणतो कसा...
चला पटला म्हणावं एकदाचा,...
ही नाती पण कशी असातात ना...
.
.
मग कळलं जोडी आहे सुंदर...
अस देतय कोणीतरी दुवा....
.
अग वेडू कविता लिहीलिये तुझासाठी...
मीच दिलाय तो दुवा...
जोडी आहे एकदम भारी.....
तुम्हा दोघांची.....
ठाऊक आहे मला...
सदा सुखी राहा तुम्ही...
प्रार्थना करेन तुम्हांसाठी "मी"
कायमची.........

- शशांक नवलकर २०-६-२०१०

वळणाच्या वाटेवर...

.

अनेक पाऊलं चालत गेलो..
धुक धुकं सारं धुसर होते
मनातली कोडी सोडवत बसलो...
पुढे वळण वाढतच होते

आज मला आठवतात
ते सारे मार्ग मी चालून गेलो....
तू सोडून गेलीस अन "मी" हरवलो...
अश्याच येत्या प्रत्येक वळणांवर
त्या आठवणी अशाच साठवतात..

दिवस तास मिनीटे सेकंद
चालत जातात चालत जातात
उंच सरळ रूंद अरूंद
आयुष्यात वळणं येतच राहतात

अनेक माणसं भेटत आली...
अनेक माणसं सोडून गेली..
एकच गोष्ट सारखी होती...
मी...मीच.. अन मीच.........
त्या वळणाच्या वाटेवर

- शशांक नवलकर २८-६-२०१०

आज जगण्यासाठी...

क्षणही अपुरे पडले सारे आयुष्य जगण्यासाठी...
का? कशासाठी..कोणासाठी....तुझ्यासाठी!...

अंधार दिलास काळोख दिलास...
आज जगेन त्या प्रकाशासाठी....

वादळे दिलीस पाऊस दिलास...
ओल्या आठवणी....फक्त माझ्यासाठीच..

जगायच होते तिच्यासाठी...पण स्वत:साठी??
व्याकूळ झालो त्या क्षणासाठी..अन आज..!!

खूप जगायचय पण क्षण कमी आहेत....
कारण....मुठीतली वाळू निसटत आहे..

तेजस्वी ज्योतीसारखं जळायचय...
पण आगही थांबत नाहीए आज...जाळण्यासाठी..

मी विदूषक झालो...हसवण्यासाठी...
पण कोणीच हसले नाही...म्हणून मी....

आज फक्त एकदाच.......
जगायचय....भरभरून आयुष्य...

उद्या............
जाण्यासाठी.....

- शशांक नवलकर २३-८-२०१०

त्याचा पाऊस , तिचा पाऊस अन मी........


एकटाच चालत राहिलो...
कोणाचाही विचार नव्हता...
विचार करत राहिलो तर...
अरे वेड्या थांब माझा हात धर...
तिचाच होता तो हात..
फक्त माझ्यासाठी...(तो)

स्वप्न बघितले होते मी...
तुझ्यासवे आयुष्य जगण्यासाठी...
तुझ्यासोबत आहे असेन रे...
तुलाही असच वाटत असेल ना रे..
साठली उरात अशी अनेक स्वप्नं..............
फक्त तुझ्यासाठी.....(ती)

सोबत नसते हल्ली तुझी...
म्हणे वेळ नसतो बोलायला...
म्हणून आजकाल तो ...
माझा सोबती झालाय .......
म्हणू नकोस काय रे आर यू "गे"...
तुझ्याविना तोच साथ देतो...भिजताना....(तो)

दुरावा हा सहन नाही होत..
जगणे श्वास एकट्यानेच
तुझ्याशिवाय अशी सवय नाही होत
मलाही मग एकटेच भिजावं लागते...
पाणवलेल्या डोळ्यांनी....
पापण्या उघडतात...ओढ फक्त तुझीच असते....(ती)

------------------------------------------------------
ओल्या पापण्यांनी सुकणारी स्वप्नं बघतेय ती...
ओल्या पावलांची वाट शोधतोय तो...
एक तरी वळण असेल जिथे.......
त्या दोघांचं मिलन....!
होईल का....?

कविता ही होते त्या दोघांसाठी....
ओथंबणा-या अश्रूंसाठी...
एकटाच चिंब बरसण्यासाठी.....
त्या दोघांसाठी
अन.......त्या पावसासाठी........(मी)

- शशांक नवलकर ०३-०९-२०१०