Thursday, February 25, 2010

....

आजवर मी अश्या अनेक लोकांना गमावले ज्यांची किंमत माझ्या आयुष्यात अमूल्य होती... ते सर्व आज माझ्यापासून दूर आहेत.....वा मी त्यांपासून अलिप्त आहे. आज ही कविता अर्पण करतो त्या सर्वांसाठी ज्यांनी मला अगदी मनापासून जीव लावला... पण मी...........त्यांना गमावले.


आजही आठवण येते
त्या सर्वांची...
ह्ळूच पुन्हा साठवण होते ......
त्या गमवलेल्या नात्यांची........
म्हणतात नाती सहज तुटतात....
बनता बनवता ती नाती अशी बनतात....
जणू त्या नात्यांचे अनेक अनुबंध जुळतात.
तेच अनुबंध जपता जपता..
अनेक नाती हरवली...
मला हवी हवीशी माणसं........
मीच गमवली..
.
.
.
नाही मी त्यासाठी काही रडत नाही....
पण ती माणसं नाहीत म्हणून
हसतही नाही...
आठवण येते हो..
खरच मला त्यांची खूप आठवण येते.
कोणीतरी मला बोलून गेले......
काही माणसांची किंमत ती नसतानाच कळते...
खरच होते ते........
.
.
.
जी नाती अनमोल असतात.....
जी माणसं जणू सोन्यासारखी असतात......
त्यांची आठवण येतेच......
आजकल अशी माणसं क्वचितच सापडतील
ज्यांना मी दुखावलं...मी दुरावलं
ती आता फक्त कवितेतच माझ्या सापडतील.......
कदाचित ती मला मिळणारच नाहीत....परत.......
किंवा परत मिळतील का?????
.
.
.
आज नवी नाती जोडताना..
अनेकदा मनी विचार दाटून येतात.
पुन्हा तिला तसेच गमवले तर.........
पण नाही...आता मी जपेन.......
अगदी माझ्या श्वासांसारखी
ती नाती......
जपेन.......
.
.
ते अनुबंध...मी जपेन.............

- शशांक नवलकर २५-२-२०१०

1 comment:

Unknown said...

Shashank
kavita kaay jabrat lihili aahes tu pratek shabd asa kaaljat rutato ekdam
mast yaar shbd tar faarrach surekh aahet