Wednesday, February 27, 2008
आज ती आली होती...
माझ्या अनेक आठवणींत ती होती
अनेक स्वप्नांत फक्त तीच होती
पण आज नव्हती आठवण नव्हती
जिथे ती मला सोडून गेली...तिथे आज ती आली होती
तिच्या आठवणींत जगत होतो आयुष्य
कोय्रा कागदांचे पुस्तकच बनले ते आयुष्य
पण तिच्या गंधाने ती पाने रंगून गेली
अशा पुस्तकांची गर्दी होती...तिथे आज ती आली होती
ह्र्दयातील स्पंदनं वाढत होती
जणू माझे ह्र्दय तिला हाक मारत होते
पण ती हाक तिला ऐकू आली नाही
कारण तेव्हा ती माझी नव्हती...पण का तिथे ती आली होती?
मन माझे म्हणत होतं नको पाहू तिथे
ह्र्दय माझे सांगत होते पुन्हा तिला जाऊन मिठीत घ्यावे
कोणा कोणाचे ऐकू मी कोणीच काही बोलत नव्हते
आज तिच्या मिठीत मी नव्हतो पण....तिथे आज ती आली होती
मन माझे घट्ट केलं ह्र्दय माझे भरून आले
आतुर होतो मी तिच्या भेटीसाठी
घ्यावे तिला मिठीत व मिटवाव्यात त्या आठवणी
पण तिथे आज ती एकटी नव्हती...पण ती माझ्यासाठी तिथे आज आली होती
Sunday, February 24, 2008
मी विरूद्ध मी...
कधीतरी घ्यावा शोध मी मज स्वत:चा
शोध मज मनातील आसक्त भावनांचा
तिथे नसतात सावल्या नसतो प्रकाश
असतो फक्त मी अन माझे प्रतिबिंब
प्रतिबिंब मज भावनाचे असे तिथे
प्रतिबिंब सुखी व्यक्तिमत्वाचे
आशा-निराशांचे सुख-दु:खांचे
कोणीच नाही तिथे...फक्त मी विरूद्ध मी...
कल्पनारम्य वाटे हे सर्वकाही
पण खरच घ्यावा शोध स्वत:चा
त्या प्रतिबिंबासमोर असतो फक्त मी...
व मजसमोर असते माझे प्रतिबिंब
प्रतिबिंबात दिसे मज प्रकाश
पण मला न दिसे माझी सावली
विरक्त माझे मन कोरडे झाले ह्र्दय
अलग असे सर्व काही जिथे दिसे मी विरूद्ध मी...
कधी असा दिस यावा एकरूप व्हावे
प्रकाशात सावली असावी ह्र्दयात रक्त वहावे
कुठेही दु:ख नसावे असावा फक्त आनंद
पण प्रत्येक वेळी असते हे प्रतिबिंब इथे-तिथे
शोध घ्यावा सर्वांनी स्वत:चा
जिथे आहेत दु:ख-यातना वाद-कलह
डोकाऊन पहावे आपल्या आयुष्यात
आपल्या प्रतिबिंबाला जवळून पहावे
जेव्हा घेतला मी मज स्वत:चा
पाहील मी मज स्वत:ला प्रतिबिंबात
वाटते एकरूप व्हावे त्या रूपाशी
पण उरते फक्त ते प्रतिबिंब.. जेव्हा असतो मी विरूद्ध मी
Saturday, February 16, 2008
सावल्यांची कविता....
यावा तो दिवस
दिवस सावल्यांचा
अंधाराचा दिवस
काळोखाचा दिवस
जिथे असावे सावल्यांचे अस्तित्व
नांदावे सावल्यांनी सर्वत्र
जिथे असावे आपले अस्तित्व
जिथं आहे जन्म माणसाचा
तिथेच आहे जन्म त्या सावलीचा
नसावा प्रकाश त्यांना घालवणारा...
त्यांना काही सांगायचे आहे
मरणाय्राला वाचवायचे आहे
मारण्याला थांबवायचे आहे
प्रकाश का हे थांबवू शकत नाही?
त्या सावल्यांना काहीतरी सांगायचे आहे
कोणीतरी करावी कविता सावल्यांसाठी
ती असावी फक्त त्या सावल्यांसाठी
जिथे असावे सावल्यांचे अस्तित्व
पण त्या सावल्यांचा संवाद नाही व्हावा
कोणी ही का ऐकत नाही त्यांचे...
जे थांबवू नाही शकत हा प्रकाश
सावल्यांना ते अंधारात करू द्या
करावी एक कविता सावल्यांसाठी
जी फक्त त्या सावल्यांनाच वाचू द्या
म्हणून मी केली ही कविता त्या सावल्यांसाठी
कोणी वाचणार का?
थांबावा आज तुझा हात
आला तो दिस प्रेमाचा
दिस तुझा आणि माझा
दिस प्रत्येक प्रियकराचा
दिस प्रत्येक प्रेयसीचा
आज येई तो क्षण प्रेमाचा जिथे थांबावा तुझा हात
ना असावा वाद कुठेही
असावा संवाद सर्वत्र
एक व्हावे दोघांचे श्वास
नाते जुडावे दोघांचे खास
जिथे असावा त्या स्पर्शाचा आभास तिथे असावा तुझा सहवास
जगा ते प्रेमाचे क्षण
बनवावेत ते अविस्मरणीय
जगावा तो दिस प्रत्येकाने
अनुभवावा तो अस्वाद प्रत्येकाने
जिथे असावा प्रेमाचा सहवास तिथे थांबावा तुझा हात
तो दिवस येई फक्त एकदाच
जेव्हा जुळतात दोन ह्र्दयांची नाती
देवाच्या दरबारी बनले नाते
नाते ते होते प्रेमाचे..नाते जिव्हाळ्याचे
असावे तुझे नि माझे असे अनमोल नाते तिथे मी थांबावा तुझा हात
वाचावीस तु ही कविता
जवळ यावेस कवेत यावेस
जगावे मी फक्त तुझ्यासाठीच
असावा तुझा सहवास मज आयुष्यात
जिथे आहे तुझा आभास,तुझा सहवास तिथेच थांबावा मी तुझा हात
Tuesday, February 12, 2008
जगावा तो दिस पुन्हा पुन्हा ...
जगतो आहे मी प्रत्येक दिवस
दिवसातील तो एक एक क्षण
त्या प्रत्येक क्षणाचा आभास
त्या आभासाचा अनुभव तो स्पर्श
पण जगावा तो दिस पुन्हा पुन्हा... तो दिस प्रेमाचा...
सारे जग जगती दो दिस प्रेमाचा
साजरा करती तो क्षण प्रेमाचा
तिची चाहूल लागावी तिच्या मिठीत पडावे
आठवणींत माझ्या तिने माझ्या मिठीत रडावे
अनुभवती मी श्वास तिचा फक्त त्या दिवशी... जगावा तो दिस पुन्हा पुन्हा
ज्यांना ना लाभती ते प्रेम...ना प्रेयसी
नका होऊ दू:खी तयाची ओढ त्यांना लागसी
आयुष्यात प्रेम मिळतेच अस नाही
पण का नाही ते मिळवावे व आनंद मिळवावा
ते क्षण बनवती तो दिस प्रत्येक क्षणी खास....जगावे त्या क्षणांसाठी.. तिच्यासाठी
साजरा होवो तो दिन प्रेमाचा
तिन्ही प्रहरी तिन्ही सांजी तिन्ही निशा
असावा तयाचा पसर सर्वत्र दिशा
असा असावा तो दिन प्रेमाचा...तो क्षण प्रेमाचा
यावा असा दिवस आयुष्यातील प्रत्येक क्षणी.... मी जगावा असा हा दिस पुन्हा पुन्हा ...
यावा असा दिवस तुमच्याही आयुष्यात त्या दिवशी जगावे तुमचे प्रेम....
तुम्ही ही जगावा तो दिस पुन्हा पुन्हा...
wish u all a happy valentines day
लागली ओढ त्या क्षणांची आज
थंडीत घालवलेले ते गरम दिवस
उन्हामध्ये आडोशातले ते दिवस
भर पावसात भिजलेले ते दिवस
चांदण्या रात्रीत घालवलेले ते दिवस
आज आत्ता ते दिवस मज आठवतात... म्हणूनच लागली ओढ त्या क्षणाची आज
प्रत्येक क्षणात आठवणी अनेक
आठवणींत रुतलेले स्पर्श अनेक
नाते दोघांचे एकसारखेच असते
म्हणूनच ते असतात अविस्मरणीय
आठवतात मला ते क्षण आठवतात ते स्पर्श... ओढ लागली आहे मला त्या क्षणांची आज
रुततात प्रत्येक क्षणांत अनेक संबंध
त्या संबंधात रुततात अनेक मर्मबंध
जगावे ते क्षण आज अनेकदा जणू
कधी न जावेत क्षण ह्या आयुष्यातून पुन्हा...
बनून जावेत हे क्षण ह्या आयुष्यातील रंग व रंगवावे मी मज आयुष्याचे चित्र
रंगून जावे ह्या प्रेमरंगात
क्षणात जावे हरवून त्या प्रेमाच्या
झालो आहे मी क्षणभंगूर त्या एका क्षणासाठी
पुन्हा जगावेत ते सोनेरी क्षण स्मरावेत ते सोनेरी क्षण
आज वेध आहे मज त्या दिवसाचा.... म्हणूनच मज लागली आहे ओढ त्या क्षणांची आज
Saturday, February 9, 2008
लागली ओढ त्या शब्दांची आज
शब्दांच्या ओळी बनतात जेव्हा
आठवतो तो प्रत्येक शब्द मला
तो शब्द कधी न विसरणारा
काय होते त्या शब्दात ज्यातून बनते ही कविता.....
मला लागली आहे ओढ त्या शब्दांची आज
दु:खी कविता प्रेम कविता
व्यंग कविता व्यक्तिमत्वावर कविता
ह्या सर्वांत ऋतले होते अनेक शब्द
ओळखू शकलो असतो त्या शब्दांना मी तर...
ते शब्द आज मला हवे आहेत जणू.. वेडच लागले त्या शब्दांचे
आज ऐकावीशी वाटते तिची हाक
तिच्या ओठांतून ऐकावे ते शब्द... शब्द प्रेमाचे
ऐकून ते शब्द मज अंत:करण भरून यावे
पण ते शब्द हरवले आहेत मज अंत:करणात
शोधू कुठे मी त्या शब्दांना मज लागली आहे ओढ आज त्या शब्दांची
असते त्या शब्दांचे महत्व अमाप
कारण ते शब्द असतात कधी न संपणरे
प्रत्येक शब्द प्रत्येकासाठी महत्वाचा असतो
कधी तो वाईट असतो कधी चांगला
अमूल्य असतात हे सगळे शब्द म्हणूनच ओढ लागली आहे आज त्या शब्दांची
शब्द आनंदाचा शब्द प्रेमाचा
क्षण सुखाचा क्षण उल्हासाचा
शब्द दु:खाचा शब्द विरहाचा
प्रत्येक क्षण समावती त्या शब्दांजोगे वैषिष्ठ्य
म्हणूनच मला आज लागली आहे ओढ त्या शब्दांची...
Thursday, February 7, 2008
विझून जाऊ देत त्या आठवणी मज मनातून
सुखद आठवणी आनंद देतात
दु:खद आठवणी दु:खच देतात ना....
त्या आठवणी विसरून जाऊ शकतो पण..
त्या अंत:करणातून विझत नाहीत...जखमा देत असतात
पण आज ते क्षन आले..जेव्हा विझती त्या आठवणी मज् मनातून
ही दु:खी कविता नाही असे म्हणतो मी
पण जी दु:ख होती त्यांना आज विझू देत
आयुष्यात येत आहेत अनेक आनंदाचे क्षण
आज त्यांना मला जगू देत...अनुभवू देत
जगू दे मला ते आनंदी क्षण व विझून जाऊ देत त्या आठवणी मज मनातून
त्या दु:खात होते मज अन तिचे आनंदाचे क्षण
पण आज ती नाही तिचे क्षण नाहीत काय करू मी त्यांचे
नाही तमा आज मला त्या क्षणांची जे मज देती त्रास
काटेच ते झाले आहेत आता रूपत आहेत अंत:करणात
दूर करू दे मला त्या काट्यांना विझून जाऊ देत त्या आठवणींना
जेव्हा असतो सगळीकडे आनंद पसरलेला
तेव्हा काय करू मी ह्या दु:खद क्षणांचे... आठवणींचे
ते आनंदी क्षण त्या आठवणी जणू पुन्हा पुन्हा जगाव्या
आयुष्याच्या लेखातून जणू ते पान गळून जावे ज्यात असावेत ते क्षण..त्या आठवणी
म्हणूनच का ते सुख तो प्रत्येक क्षण मला जगू दे व विझून जाऊ दे त्या आठवणी मज मनातून
Wednesday, February 6, 2008
देवा मी तुझ मांगतो ते मिळत नाही...
लहान मुले प्रार्थना करतात
मोठी मुलं प्रार्थना करतात
प्रार्थना आपण सुद्धा करतो.. प्रत्येकाने करावी
पण प्रार्थनांना यश मिळते़ का?
देवा मी तुझ मांगतो ते मिळत नाही...
प्रेम केल त्यांनी तिच्यावर जिवापाड
त्यांनी प्रार्थना केली तिला मिळवण्यासाठी
तिच्या सु:ख दु:खासाठी खूप काही केले
पण त्यांच्या प्रार्थनांना यश कधी आले का?
प्रेमासाठी मागतो पण देवा तुज ते मागतो तेव्हा मिळत नाही...
आयुष्यात यशस्वी व्हावे म्हणून लोक प्रार्थना करतात
मेहनत करून यश नाही म्हणून देव-भक्ती स्वीकारतात
यशासाठी घाम गाळणारे अश्रू गाळण्यास भाग पडतात
त्यांच्या श्रमाला त्यांच्या भक्तीला त्यांच्या अश्रूंना कधी यश आले का?
मेहनतीचा दुवा दिलास पण देवा तुजकडे यश मागतो ते मिळत नाही...
प्रार्थना केली प्रेयसी मिळण्यासाठी तुजकडे
प्रार्थना केली आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी तुजकडे
प्रार्थना केली दु:ख विझण्यासाठी आयुष्यातुन तुजकडे
पण अश्रूच मिळाले तिथे जिथे हवे होते सु:ख-आनंद
खूप आशा होती मला पण देवा तुजकडे मागतो ते मिळत नाही....
भक्ती माझी सदैव असे तुजवर मन माझे तुच जाणितो
मी आज तुजकडे पुन्हा एकदा काहीतरी मागतो देशील का मला जे मज आज मिळत नाही
Tuesday, February 5, 2008
हरवून जावे त्या विविध रंगात
लहान असताना चित्रकला शिकली होती
रम्यपणे एका कागदावर अनेक रंग रंगवले
पण आज आठवतात ते रंग रंगवलेले
त्या रंगानी आज रंगवावे आयुष्याचे चित्र असे वाटते
पुन्हा तो काळ परत यावा व हरवून जावे त्या रंगात
त्या प्रत्येक रंगात आठवते ते बालपण
त्या रंगात आठवतात ते सोनेरी दिवस
आज पुन्हा बसावे असे एक चित्र रंगवत
त्या चित्रात असावा मी माझे आयुष्य
पण ते रंग चढतील का ह्या चित्रावर....
आज रंग बदलले त्यात अनेकांचे रक्त मिसळले
चित्रांची शोभा नाही राहीली सगळे काही झाले रंगहीन
जर आज हवी असेल प्रत्येक रंगाला शोभा
तर रंगवावे असे एक चित्र जिथे असतील गडद रंग
ते चित्र न असेल जळणारे असेल फक्त रंगणारे मन रंगवणारे
होणार का तुम्हीसुद्धा तुमच्याच आयुष्याचे चित्रकार
भरणार का तुम्ही तुमच्या आयुष्यातले हरवलेले रंग.... तुमच्याच आयुष्यात
म्हणूनच मला आज वाटते पुन्हा जावे त्या भूतकाळात
त्या विविध रंगांमध्ये हरवून जावे .........
Sunday, February 3, 2008
ती मैत्रीण...
मी मज स्वत:ला हरलो आज त्या दु:खांना हरलो
त्या वेदना यातना ते दु:खी क्षण सर्वच विसरलो
पण तू मला भेटलीस माझी सखी बनून
मला आता असे वाटते की कोणी तरी आहे माझ्यासारखे
आयुष्यात कोणाची कमी दूर करणारे कोणीच भेटत नाही
पण तू मला भेटलीस अन माझी sweet friend ची कमी दूर झाली
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जिला मी समजू शकेन
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी तू आहेस
प्रत्येक नात्याचा रंग नेहमीच वेगळा असतो
आयुष्य माझे रंगहीन होते पण आता कळत आहेत ते रंग
पण माझ्या मैत्रीचा रंग अजून तसाच आहे
कारण त्यामध्ये तुझ्या मैत्रीचा रंग मिसळलेला आहे
आयुष्यात कधीच कसली अपेक्षा करू नये
मी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही
पण अनपेक्षित देणगी दिली आज देवाने
तूझ्यासारखी मैत्रीण त्याने मला दिली
माझी ह्या देवाकडे प्रार्थना आहे
तिची मैत्री मला कायम लाभावी
माझी मैत्री तिला कायम लाभावी
तूझी न माझी friendship अशीच अतूट राहावी
नशा...
आज चढतो आहे मला नशा...
नशा शब्दांचा नशा कवितांचा
धुंद होऊनी त्या शब्दांत
लिहितो मी आज ही कविता
झिंगावेसे वाटते आज त्या कवितांमध्ये
चढते मज आज ही नशा त्या कवितेची त्य शब्दांची
दारू ची नशा आयुष्य उध्वस्त करी
जोरू ची नशा नेई रस्त्यावर जणू
पण कवितेची नशा असते निराळीच
त्या शब्दांच्या नादात भावनांच्या नादात झिंगत राहावे
थांबावेसे नाही वाटत ह्या नशात रमताना..चढू दे मज हा कवितेचा नशा
न असावी कसली चिंता
न असावी कसली हुरहुर
विसरून जावीत सगळी दु:ख सगळे विचार
हरवून जावे त्या शब्दांमध्ये त्या कवितांमध्ये
चढतो मला आज हा वेगळाच नशा...येते मज आज वेगळीच मजा
नको आज कुठलाही रिकामा ग्लास
नको आहे मला कुठलीही रिकामी जागा
कोणीही नसले तरी चालेल आज
कारण गुंग होणार मी ह्या कवितांत आज
जेव्हा चढते ही अजब नशा बघा येते कशी मज्जा.....
रेशीमगाठी
अलगद जुळता जुळता जुळली ही नाती
म्हणूनच का म्हणतात त्यांना रेशीमगाठी
नाजूकच असतात ती का लवकर तुटतात
असतात नाती ती अनमोल म्हणूनच म्हणतात त्यांना रेशीमगाठी
आठवणींच्या होत्या त्या अनेक गाठी
का थांबल्या नाहीत तुटण्यावाचून त्या रेशीमगाठी
त्या बंधनाची अनामिक हुरहुर जिवा लागावी
जणू पावसाने चातकाची वाट पहावी
त्यांच्या आयुष्याला अर्थ मिळावा
बघता बघता अकुंराचा वटव्रुक्ष व्हावा
बंधन नाही उरले पण होते ते एक नाते
आठवणीच का नाही पण होत्या त्या रेशीमगाठी
अस्तित्वाला ओळ्ख माझ्या ज्या मुळे मिळते
असतात ती अनमोल नाती असतात त्या रेशीमगाठी
मना भिडणाय्रा गुजगोष्टी तीच तर खरी नाती
कधी न व्हावीत अलग अशीच जपावीत ही नाती
आठवणींच त्या होत्या का की होते ते माझे जीवन
विलग करता न उरते काही हीच तर होती त्यांची खरी मिळावण
न संपावीत ती नाती न संपावेत ते मर्मबंध
कधी न व्हावीत अलग हीच आहे त्यात शपथ
होते ते क्षण आनंदाचे
अश्रू वाहून गेले काळोख निघून गेला
उमटले चेहय्रावर हसू प्रकाश उजळला आज
नव्हते दु:खा़चे सावट मज मनावर अंत:करणावर
वादळ चक्रव्यूह अंधार सर्व काही संपले होते
आज ते दिवस आले होते हो होते ते क्षण आनंदाचे
प्रत्येक क्षण अनेकदा जगावासा वाटत होता
पुन्हा कधी तो जाउ नये इतका हवाहवासा वाटत होता
विझला होता तो अंधविश्वास तो काळोख आज कायमचा
उजळला होता तो आत्मविश्वास पसरला होता सर्वत्र प्रकाश
कोणासाठी ही थांबले नाहीत ते दिवस येणे होते ते क्षण आनंदाचे
उदास मन माझे राहीले नव्हते
आज नभ जणू आनंदाने भरून आले होते
अश्या अनेक +ve कविता लिहाव्याश्य वाटत होत्या
आज आयुष्यात दु:ख मावतच नव्हते सु:खच होते सर्वत्र
जगात आज सर्व काही उल्हासित होते कारण होते ते क्षण आनंदाचे
कोणीतरी तिला सांगेल का रडू नकोस आज
तुझ्या प्रेमात विश्व कधीच नव्हते पण विश्वात प्रेम पुनश्व मिळेल
जर मनात असेल तेवढी इच्छा आणि आस्था तर ते प्रेम पुनश्च मिळेल
नको सोडूस कधी जिद्द प्रेमात सगळे काही माफ हीच जिद्द
दु:खानी माझे प्रेम आज खुंटणार नव्हते आहेत हे आता क्षण आनंदाचे
आयुष्यातील दु:खांना करा आज तुम्ही नाहीसं
पत्येक क्षण तुम्ही बनवाल अनमोल प्रकाशाकडे लोटा
नका बघू आयुष्यात फायदा आणि कसलाच तोटा
आयुष्य जगत राहा आनंदाने आत्मविश्वासाने
परिचय होतो आहे तुमचा ह्या जगाला कारण आले आहेत आज हे क्षण आनंदाचे
Subscribe to:
Posts (Atom)