निरभ्र आकाश रात्रीचे चांदणे
सर्वत्र मी एकच गोष्ट शोधतो
मज मनाची शांतता कुठे आहे
ह्र्दयातील समुद्राची शांतता कुठे आहे
किनाय्रावर चालताना क्षितिजाकडे लक्ष
विचार करत असताना संपणाय्रा वेळाकडे लक्ष
आठवणी आठवताना नष्ट होणाय्रा आठवणींकडे लक्ष
असेच माझे लक्ष लागलेले असते जेव्हा माझे डोळे मिटतात .... अखेरचे
पण हळूच कोणी माझे डोळे उघडते... जेव्हा ...
क्षितिजापलिकडे पाहण्यापेक्षा हया सुंदर जगाकडे माझे लक्ष वेधते
हरवलेल्या आठवणींपेक्षा आयुष्यातला एक एक क्षण जपायला शिकवते
पाझळणारे अश्रु पूसणारे कोणी नसते पण रडू नकोस सांगणारे जवळ असते
मन अन ह्र्दय एकटेच असते
पण एकटा नाहीस असे सांगणारे कोणी आहे का ?
कदाचित जगात सारे एकटेच असतात
तू एकटा नाहीस हे सांगणारे पण एकटेच असतात ...
मीसुद्धा एकटाच आहे
पण मजसाठी तू एकटा नाहीस हे सांगणारे ...
नक्कीच कोणीतरी असेलच मजसारखे एकटे.....
1 comment:
मनाची अगतिकता खुपच छान शब्दात मंडलीस.
Post a Comment