Saturday, December 10, 2011

प्रयत्न....


निसटत्या वाळूसही खंत नसते
ते हात मात्र स्तब्ध असतात...

लिहीलेल्या शब्दांसही तमा नसते
भावनाही कधी कधी अबोल होतात...

क्रोधासही कधी तरी शांती लाभते...
त्या दोघांतले अंतर एक धास्ती असते

चुकल्यावर खरच खूप वाईट वाटते
योग्य मार्ग निवडण्याची सवडच नसते

धपडणे...अडखळणे....पडणे...हरणे....होते.....
कोणासही सतत हरण्याची सवय नसते

पुन्हा नव्याने उभ राहिल्यावर बळ मिळते
जिंकण्याची घाई नको..."अति तेथे माती होते"

- शशांक १०.१२.२०११

Monday, December 5, 2011

कविता होत नाही..


शब्द सुचत नाही..
विचार जुळत नाही...
यमकाचा मेळ नाही...
अखेर कविता होत नाही...

खूप असे प्रयत्न...
नको नको त्या कल्पना...
पण सारं कसं नकोसं झालय...
म्हणूनच कविता होत नाही...

पाऊस कविता लिहील्या..
नव्हेंबरातल्या पावसावरच्या..
चित्रकविताही रंगविल्या होत्या...
माझ्या अन इतरांच्या रचलेल्या...

गद्य..पद्य...अन बरेच...
खूप काही लिहीले होते..
काही कळत नाही...का?
मला ते कमीच वाटते

माझ्या असफलतेवरही कविता..
सफलतेवरही... सु:खावरही दु:खावरही..
तिच्यावरही...त्याच्यावरही...
अनेक असे शब्द मिळवले अन जुळवले..
पण आता काहीच घडत नाही...
खरतर मला आता वेळच नाही....

तरीही इतकं सारं लिहलं की...
अन "मीच" म्हणे कविता होत नाही....

- शशांक ५.१२.२०११