
जन्मलो जगण्यासाठी...
जगतो आहे झगडतो आहे...
लढतो आहे वाचवतो आहे...
टिकण्यासाठी...टिकवण्यासाठी
तुटके फुटके...ठळकसे...पुसटसे
अस्तित्व.........
शब्द जमवतो...शोधतो...वेचतो
कविता लिहीतो...चारोळ्या लिहीतो...
कागद खरडतो..फाडतो...जाळतो...
ओल्या भावना..व्यक्त होतात.
सारे काही कॄत्रिमच का??
काही तरी कुठे तरी कसे तरी... असेल...
सत्य............
मजा मस्करी...खिल्ली...ताषेरे..
सगळी व्यंग एकत्र होतात...
हसू येते रडू येते....निरस भावना!
अनेक मुखवटे रंगवतो...रंग?
चित्रकार बनतो स्वत:च स्वत:चा
सावरावं लागते माझे मलाच...
मग शोध कोणाचा?....
तिच्या अस्तित्वाचा......
अश्या अनेक खिडक्या उघडलेल्या...
त्यातून दिसणारी अनेक दॄष्यं
त्या प्रत्येक दॄष्यांत दिसणारा मी......
तोच समुद्र तोच किनारा...
आशा निराशा..सुर्यास्त..सुर्योदय...दिवस...रात्र....
सारे काही एकातच समावलेले असे एक चित्र.............
एकच गोष्ट अव्यक्त...अस्पष्ट....
हरवलेले क्षितिज..................
- शशांक नवलकर २-११-२०१०
No comments:
Post a Comment