Friday, November 19, 2010
तू अन मी....
ओळख कशी होते कळतच नाही...
कोणाशी कधीही केव्हाही....
कोणीच बघत नाही....
ह्या मैत्रीतही एक वेगळीच मजा असते..........
इतकी जपावी लागते,
नाहीतर खरच एक सजा असते
कोण म्हणतं नाती मैत्रीतनं घडत नाही..
करून तर बघा खरच काही बिघडत नाही....
मैत्री मैत्री करून कधी कधी काही मिळत नाही....
काळ वेळ मेळ ह्या सगळ्यातनंही मैत्री बनते
तुलाही हे सारं पटतं ना...
तुही कुणाशी तरी मैत्री केली आहेसच ना.....
जेव्हा होते मैत्री अशी.....
तेव्हा गोष्ट असते तुझी माझी....
आपणही दोघे मग अश्या कविता करू लागतो
अन नाव देतो.....
तू अन मी..........
- शशांक नवलकर १८-११-२०१०
Tuesday, November 2, 2010
हरवलेले क्षितिज.....
जन्मलो जगण्यासाठी...
जगतो आहे झगडतो आहे...
लढतो आहे वाचवतो आहे...
टिकण्यासाठी...टिकवण्यासाठी
तुटके फुटके...ठळकसे...पुसटसे
अस्तित्व.........
शब्द जमवतो...शोधतो...वेचतो
कविता लिहीतो...चारोळ्या लिहीतो...
कागद खरडतो..फाडतो...जाळतो...
ओल्या भावना..व्यक्त होतात.
सारे काही कॄत्रिमच का??
काही तरी कुठे तरी कसे तरी... असेल...
सत्य............
मजा मस्करी...खिल्ली...ताषेरे..
सगळी व्यंग एकत्र होतात...
हसू येते रडू येते....निरस भावना!
अनेक मुखवटे रंगवतो...रंग?
चित्रकार बनतो स्वत:च स्वत:चा
सावरावं लागते माझे मलाच...
मग शोध कोणाचा?....
तिच्या अस्तित्वाचा......
अश्या अनेक खिडक्या उघडलेल्या...
त्यातून दिसणारी अनेक दॄष्यं
त्या प्रत्येक दॄष्यांत दिसणारा मी......
तोच समुद्र तोच किनारा...
आशा निराशा..सुर्यास्त..सुर्योदय...दिवस...रात्र....
सारे काही एकातच समावलेले असे एक चित्र.............
एकच गोष्ट अव्यक्त...अस्पष्ट....
हरवलेले क्षितिज..................
- शशांक नवलकर २-११-२०१०
Subscribe to:
Posts (Atom)