Tuesday, September 29, 2009
माणसांच जंगल
माणसांच्या गर्दीत माणसं एकटीच
माणसांचा शोध घेणारी तीच
अन स्वत:चा शोध घेणारीही....
तीच
जगण्याचा शोध घेता घेता
जगणे विसरून जीव घेता
माणूस म्हणवूनी
माणूसकीचाच जीव घेता
प्रत्येक माणूस हा माणसासाठीच
प्रेमासाठी क्लेशासाठी आनंदासाठी
अगदी पोटापाण्यासाठीही....!
फक्त माणूसच
आज म्हणे
माणसासारखा माणूस उगवला
जीता नव्हे तर डागडूजीतला
मानव उमगला....
पण माणूस म्हणजे माणूसच
श्वासासाठी श्वास देणारा
रक्तासाठी रक्त देणारा
शेवटी .... तो एक माणूसच
माणसांचेही एक जंगल असते ?
हो ..
जिथे माणसंच माणसं असतात
ह्या माणसाच्या गर्दीत मी ही असतो
एकटाच असतो...........
ती माणसंही आपापल्यासाठी
एकटीच असतात का?
- शशांक नवलकर २७-०९-२००९
Saturday, September 12, 2009
ती पायवाट...
ती पायवाट...
ती वाट चालताना
नेहमीच आजु-बाजुला बघत राहीलो
काटा रूतला हळूच चालताना
अन ती पावलच रक्तबंबाळ होत गेली
लाल रक्तांची पायवाट
चालायची सवयच झाली
काटयाकाटयातून वाट काढायची
अन चालत जायची ती पायवाट
रूतल्या काट्यांनी चालायचा
सरावच झाला...
खंत वाटते आता
ती वाट चालताना.............
काटयाकाटयातून चालण्याची
सवय मोडूनच गेली
ती पायवाट चालायची सोडूनच दिली..................
- शशांक नवलकर ११-०९-०९
Sunday, September 6, 2009
तो माझा होता
तो
आठवतो मला
ओघळणा-या अश्रूंतून
काटा बनूनी
रूततो काळजात
रक्तबंबाळ भावनेतून
त्याची आठवण
बनली आज एक दलदल
अंत:करणातील व्यथांची
काळजाच्या पडणा-या ठिक-या
पुरून उरल्या
ती आठवण आयुष्यभर जगण्यासाठी
ते
आलेले एक वादळ
माझ्याच स्वार्थामुळे!!
मनात दाटलेली वर्दळ
ओढावलेल्या एकटेपणामुळे
आसक्त झाल्या होत्या नजरा....
उरलेल्या अंधुक नजा-यामुळे
"तो माझा होता"
लाज वाटते का? म्हणे सर्व
प्रेम केले त्यावर मनापासून
विसरूनी सा-या जगा
आज बदलले आयुष्य सर्व
ओठी शब्द उरले फक्त आता....
"तो माझा होता"
"तो माझा होता"
- शशांक नवलकर ५-९-२००९
Thursday, September 3, 2009
कविता....कवितेसाठी....
प्रिय कवि मित्र आणि मैत्रीणींनो ही कविता फक्त माझ्या शब्दांतून निर्मिलेल्या कवितेसाठी आहे आणि मी आजवर केलेल्या कवितांसाठी आहे . कविता नाव असलेल्या सखींनो काहीही अवचित आढळल्यास क्षमस्व....
कधी सांगतेस कथा प्रेयसीची
तिच्या मनामनातून अंत:करणातून
जाणवते व्यथा त्या प्रत्येकीची
कविते...तुझ्याच शब्दांतून
म्हणूनच करीतो आहे
आज तुझ्यावरच कविता....
चिंब भिजतेस तू
ओल्या कागदांतून....
अनेकांना अशीच स्पर्शतेस
तुझ्या शब्दस्पर्शांतून
अनावर होतो अनाहूत पणे
आतूर होतो लिहीण्यासाठी
त्या हर एक भावनेतून
कविते...ही कविता फक्त तुझ्यासाठी
होतेस तू आधार
त्या त्या लाचारासाठी
होतो तुझा प्रचार
अशा कित्येक आचारांसाठी
तू वाहतेस अनेक मनांतून
तुझे अस्तित्व जपण्यासाठी,
होतेस अमर प्रत्येक पानातून
हे शब्द वाहिले तुला मी....
कविते.....फक्त तुझ्यासाठी
कविते.......होतेस तू
माझ्या विचारांतून
स्पर्शतेस मनांना तुझ्यामाझ्या शब्दस्पर्शातून
व्यक्त होतेस प्रेमातून व्यंगांतून भावनेतून
आज हे शब्द वाहीले तुला...
फक्त तुझ्याचसाठी
कविते लिहीले ही कविता
आज फक्त तुझ्याचसाठी
- शशांक नवलकर ०२-०९-२००९.
Subscribe to:
Posts (Atom)