Sunday, March 29, 2009

तू माझ्यात असताना.................


तुझे माझ्यात असणे
माझे तुझ्यात असणे
कधी न सोडवे हा लळा
स्पर्श असे तो वेगळा...
असाच एक अनुभव...
असाच एक क्षण...
तू माझ्यात असण्याचा...
माझ्या ह्र्दयाच्याच स्पंदनात
तूच असण्याचा....

पुसले होते मी ते क्षण....
तू माझ्यात नसताना...
मिटले होते मी माझे डोळे.....
तू माझ्याजवळ नसताना....
.... मिटलेच होते मी डोळे....
तेव्हा दिसली होतीस,....फक्त तूच....
खरच... मिटले होते मी माझे डोळे....
तेव्हा.....तुलाच बघण्यासाठी....

जगणे उणे श्वासाविना...
माझे मी न होणे तुझ्याविना...
आहे मी अपूरा तुझ्याविना....
आहे ही वाटही अपूरी तुझ्याविना..
चालतो आहे मी तुझ्यासवे...
बनूनी एक स्पर्श...एक आभास........

मी तुझ्यात असताना..
आहे माझी वाटही अपूरी ...
कधी कधी असतो मी एकटा.....
पण नसतो मी कधीच एकटा
.
.
.
तू माझ्यात असताना.................

- SHASHA™....

Thursday, March 19, 2009

satisfaction ("समाधान")



असूनही हात आज माझे रिक्त
न राहीलो मी कधीच अव्यक्त
हास्यमुखी मुखवटे का असोत...
हसून जगण्यातच आहे एक समाधान
प्रेम विरह सु:ख दु:ख सर्व आहे
आज त्यातही मिळते समाधान
कारण, आज मजकडे सर्वस्व आहे
ना कसली खंत ना कसली उणीव
आयुष्य मी जगतो आहे
प्रत्येक क्षण असेच हसत जगतो आहे
कोणीच विचारत नाही माझी दु:ख
न कोणी विचारत माझ्या मनातील भावना
नसते कोणालाच माझी चिंता
पण त्यांची असण्याची जाणीव...
मजला देऊन जाते एक शक्ति
नसते काहीच असाध्य..
सिद्ध होऊनी जगावे आयुष्य
त्यातच मिळते खरे समाधान
हो,...त्यातच मिळते आहे समाधान
जेव्हा रिक्त असूनी मिळेल सर्वस्व
अव्यक्त असूनी होतील भावना व्यक्त
न उरतील कोणतेही मुखवटे
प्रत्येक व्यंग असेल जिते दृष्य
तेव्हाच मिळेल मला खरे समाधान
त्यातच असेल माझे खरे समाधान

- शशांक नवलकर

Monday, March 16, 2009

"u turn"


आयुष्याच्या वळणावर
नेहमीच येतो u turn
प्रेमात पडता न पडता
तिच्या ह्सण्या रूसण्यावर
घ्यावा लागतो हा u turn

life आपली मस्त असते
पोरीशिवाय स्वस्त असते
प्रेमात पडताच व्यस्त असते
"काय यार life अशीच उध्वस्त असते...."

music आणि dance काय धम्माल असते
पार्ट्या पोरी अशीच आपली कम्माल असते
प्रेमात पडून आयुष्याचं music विस्कटून जाते
अन ती मदारी अन त्याचा माकडागत dance होतो

प्रेमभंग होऊनी टूटतात बंध
फुलेही सोडतात तो प्रेमाचा गंध
का प्रेमानेच नाती बंधतात व टूटतात
अन का पुन्हा ती प्रेमानच जुळतात
आयुष्याच्या वळणावर नेहमीच u turn असतो
म्हणूनच प्रेमातही असाही एक u turn असतो......

- शशांक नवलकर

Wednesday, March 11, 2009

empty



हे जग हसते मला....
वेडं म्हणते मला..
का पडतो मी प्रेमात
का असे कोणाची तमा,चाहूल,चिंता..
जगतो आहे मी माझ्या मनी...
तरीही का लागते हुरहुर मनाला
दिशाभूल होता सावरतो मनाला...
मग क्षणो-क्षणी कोणाची कमी कशाला...
सुखात असतो मी माझ्यापरी
अवलंबून नाही मी कोणापरी
मग दु:ख नसूनी व्यक्त आहे कशाला
जगणे मुठीत घेऊनी फिरतो आहे
का कोणास ठाऊक हे प्रश्न कशाला
शोधितो आहे अजुनी यांचे उत्तर
जर उत्तरच नाही मग प्रश्न कशाला...
जगणे जर असेल असेच रिक्त
तर मग ह्या प्रश्न-उत्तराचा खेळ कशाला..
असे प्रत्येक प्रश्नाचे एक उत्तर
मिळे ज्याला कळले असावे जगणे त्याला
असावं त्याचेही आयुष्य एकदा असेच रिक्त................

- शशांक नवलकर