Wednesday, May 1, 2013

काही बाकी राहीलेले....





नको नकोसं वाटणारं सारं काही...
हव हवसं दिसतच नाही
मग जीव वेडापिसा...घुसमट
चालायचच....

शब्दांत मांडता यावं
असं काहीच नसतं
.
.
जे बोलायचं ते बोललच जातं

थांबायचं नाही चालत रहायचं
अनेक स्वप्नं बाळगून जगायचं
खूप काही ठरवायचं
ह्या सगळ्यांत
जगायचं कधी ????

नेहमीच एक करावं
जे आतून वाटेल तेच ठरवावं
कोणासाठी तरी थोडं थोडं जगावं

एकदा तरी हे करून पहावं

- #शशा १।५।१३