Sunday, March 11, 2012
सोहळा मैत्रीचा ....
अनेकांना अनेक जण भेटतात
त्या प्रत्येक क्षणाचा आनंद
लुटावा असं वाटतंय
कधीतरीच असं कोणास वाटत असाव
पण आज एक संधी मिळाली
त्या क्षणांचा सोहळा व्यक्त करण्याची
.
.
शब्द कमी पडावेत
लिहिण्यासाठी... त्या प्रत्येक नात्यावर...
नाही यार प्रेमावर नाही
नाते , मैत्रीचे जीवाभावाचे
जिवलग भावनेचे
त्या प्रत्येक भावनांचा सोहळा
संधी मिळाली व्यक्त करण्याची.....
.
.
अर्पितो आहे हि कविता
त्या प्रत्येक मैत्रीसाठी
जिने मला जगायला शिकवले
हसायला शिकवले
पुढे वाटचाल करण्या सांगितले
अन म्हणाले , मी आहे तुझ्या सोबत
अशी मैत्री असेल तर मग अजून काय हवं
- शशांक नवलकर ११.३.२०१२
Thursday, March 8, 2012
"गहाळ"
सतत विचारांचं ओझं
जमलेलं पसरलेलं...
अव्यक्त....अस्पष्ट...
शोध घेत होतो त्यांचा
कदाचित माझाच अंत...
खरच वाटू लागलय...
मला इथून कोणीतरी घेऊन जावं
सहन करत राहीलो.....
काहीच बोललो नाही...
वेळ आली अन गेली....
काहीच करू शकलो नाही....
पळवाट शोधतो आहे !
नाही तो स्वभाव माझा नाही....
पण खरच एक वाट हवी आहे...
निसटण्यासाठी....
वाटलं होतं कधी तरी
कधी तरी.....सारं बदलेल....
पण बदल न घडण्याची...
सवयच झाली सगळ्यांना..
पण बदल .....
गरज बनला आहे माझा.....
एका व्यसनासम.....
तो हवा आहे मला...
इतकं विचित्र लिहीताना...
खरच अगदी खरच
मला कुणीतरी घेऊन जावं
अश्या कुठेतरी....
जिथुन इथे परतण्यास....
मार्ग नसेल....
- शशांक नवलकर ८/३/२०१२
Subscribe to:
Posts (Atom)