Tuesday, February 7, 2012

नवीन कविता...

जुन एक विरह कविता...
लिहीता लिहीता संपत गेलो....
संपता संपता खुंटत गेलो.....
शेवटी समाप्त सर्वस्वाचा.....
.......
.......
........

( पुन्हा नवा कागद घेऊनी )

शेवट तसा वाईट होता....
नाती कळायला लागताच...
त्यांचाच एक अनाहूत अंत....
शब्दांची जुळवाजुळव
अन खूपश्या कविता..
संदर्भ त्यांचा एकच....
नात्याचा तो शेवट
जे झाले ते झाले...
पुढे...
जावे तर लागणारच
मागे वळायची गरज नाही....
नवी वाट दिसणारच...
नवे संकल्प...
नव्या कल्पना
मग नवीन कविता सुचणारच....

- शशांक नवलकर ७.२.२०१२

तू नसताना...


अनेकदा मनी येतात...
त्या वेदना-विवंचना...
चिंतितो मी एकांत माझा...
तू नसताना....

ते दिवस आठवताना...
कधी अलगद अश्रू
तर कधी स्मित हसू..
व्यंगांचाहा फापटपसारा....
तू नसताना...

शब्दही माझे अपुरे पडतात...
तो कागद चिंब करताना
व्यक्त करता येत नाही मला...
पण कसे सांगू....
तू नसताना...

प्रतिबिंबाचाही शोध मनास लागतो..
तुझ्या तू नसताना........
एक कविता मी तुज अर्पितो..
तू नसताना....
तू नसताना......

- शशांक