Sunday, October 7, 2012

विचारांचे retribution




संकल्प सोडला होता मनाशी..
ना कधी लिहीन काही
शब्दांना बंद करूनी त्या खोलीत
एक नवा आरंभ करेन....

पण....बंधन पचवले !!!
तर ते माझे शब्दच कसले
पुन्हा उरात तीच हुरहुर
अन तोच दबदबा मनावर दाटलेला.........

एकांतात अनेकदा वाटतं लिहावंस
पण सारे रिकामे कागद....
.
.
.
अखेर पुन्हा सुरूवात केलीच....

- शशांक नवलकर ७/१०/२०१२

Sunday, March 11, 2012

सोहळा मैत्रीचा ....




अनेकांना अनेक जण भेटतात
त्या प्रत्येक क्षणाचा आनंद
लुटावा असं वाटतंय
कधीतरीच असं कोणास वाटत असाव
पण आज एक संधी मिळाली
त्या क्षणांचा सोहळा व्यक्त करण्याची
.
.
शब्द कमी पडावेत
लिहिण्यासाठी... त्या प्रत्येक नात्यावर...
नाही यार प्रेमावर नाही
नाते , मैत्रीचे जीवाभावाचे
जिवलग भावनेचे
त्या प्रत्येक भावनांचा सोहळा
संधी मिळाली व्यक्त करण्याची.....
.
.
अर्पितो आहे हि कविता
त्या प्रत्येक मैत्रीसाठी
जिने मला जगायला शिकवले
हसायला शिकवले
पुढे वाटचाल करण्या सांगितले
अन म्हणाले , मी आहे तुझ्या सोबत
अशी मैत्री असेल तर मग अजून काय हवं

- शशांक नवलकर ११.३.२०१२

Thursday, March 8, 2012

"गहाळ"




सतत विचारांचं ओझं
जमलेलं पसरलेलं...
अव्यक्त....अस्पष्ट...
शोध घेत होतो त्यांचा
कदाचित माझाच अंत...
खरच वाटू लागलय...
मला इथून कोणीतरी घेऊन जावं

सहन करत राहीलो.....
काहीच बोललो नाही...
वेळ आली अन गेली....
काहीच करू शकलो नाही....
पळवाट शोधतो आहे !
नाही तो स्वभाव माझा नाही....
पण खरच एक वाट हवी आहे...
निसटण्यासाठी....

वाटलं होतं कधी तरी
कधी तरी.....सारं बदलेल....
पण बदल न घडण्याची...
सवयच झाली सगळ्यांना..
पण बदल .....
गरज बनला आहे माझा.....
एका व्यसनासम.....
तो हवा आहे मला...

इतकं विचित्र लिहीताना...
खरच अगदी खरच
मला कुणीतरी घेऊन जावं
अश्या कुठेतरी....
जिथुन इथे परतण्यास....
मार्ग नसेल....

- शशांक नवलकर ८/३/२०१२

Tuesday, February 7, 2012

नवीन कविता...

जुन एक विरह कविता...
लिहीता लिहीता संपत गेलो....
संपता संपता खुंटत गेलो.....
शेवटी समाप्त सर्वस्वाचा.....
.......
.......
........

( पुन्हा नवा कागद घेऊनी )

शेवट तसा वाईट होता....
नाती कळायला लागताच...
त्यांचाच एक अनाहूत अंत....
शब्दांची जुळवाजुळव
अन खूपश्या कविता..
संदर्भ त्यांचा एकच....
नात्याचा तो शेवट
जे झाले ते झाले...
पुढे...
जावे तर लागणारच
मागे वळायची गरज नाही....
नवी वाट दिसणारच...
नवे संकल्प...
नव्या कल्पना
मग नवीन कविता सुचणारच....

- शशांक नवलकर ७.२.२०१२

तू नसताना...


अनेकदा मनी येतात...
त्या वेदना-विवंचना...
चिंतितो मी एकांत माझा...
तू नसताना....

ते दिवस आठवताना...
कधी अलगद अश्रू
तर कधी स्मित हसू..
व्यंगांचाहा फापटपसारा....
तू नसताना...

शब्दही माझे अपुरे पडतात...
तो कागद चिंब करताना
व्यक्त करता येत नाही मला...
पण कसे सांगू....
तू नसताना...

प्रतिबिंबाचाही शोध मनास लागतो..
तुझ्या तू नसताना........
एक कविता मी तुज अर्पितो..
तू नसताना....
तू नसताना......

- शशांक

Monday, January 30, 2012

Feeling....


that feeling, hurt deep within
makes me search those wounds...
in my freakinnn brain.....
never wished to search
those questions strike in my head
as a horrid pain...
sometimes i think....
why this all happen....
will it give any kinda gain !!!
then things start changing...
with the new beginnings.....
with an unexpected rain....
but still i wait for the moment....
to happen what it should.........
all over again

- shashank