सारा प्रयास पसार झाला..
बघण्यास आता फक्त अंत आहे
उगवलो मी नव्याने आता..
एकटाच का....ही खंत आहे
बघण्यास ओल्या पापण्यांनी
खुला तो आसमंत आहे...
जगतोय आता श्वास जपूनी
दिखावाच हा मी जीवंत आहे
स्वप्नं घेऊनी उराशी
एक नवे स्वप्न बघतो आहे
मिटल्या डोळ्यांनी दिसेनासे
एक असे चित्र शोधतो आहे
स्वत:शीच केला मी एक करार...
जगण्यास एक कारण शोधण्याचा
साथ तिची अनाहूत मिळवण्याचा
अंतास....स्वत:च पुसट होण्याचा
- शशांक नवलकर २०-५-२०११