शब्द माझे हरवले
स्टेटस लावला बरा...
कविता लिहणे जमत नाही
बहाणा मिळाला खरा
पूर्वीसारख्या कविता का होत नाही...
असे का घडले काहीच कळत नाही...
वाटायचे असे खूप..
पण आता वाटणार नाही.....
कविता आहे सखी...
कविता आहे सोबत.........
असे कधी कधी वाटते ...
मग बहाणा सुचतो खरा...
लिहीणे पण मग चालू...भराभरा....
वाचाल ही कविता .....
हो...नाही...माहीत नाही....
ह्यातले काहीतरी असो..
काहीच हरकत नाही...
जेव्हा पण वाचाल तेव्हा वाचेल...
मग मला ही वाटेल..
चला अखेर कविता सुचली......................
- शशांक नवलकर ११-५-२०१०
Tuesday, May 11, 2010
आजकाल स्वप्न पण अपूरीच पडतात
पाहतो स्वप्न पूरी करण्यास
जीवन जगतो ती स्वप्न जगण्यास
मुठीतनं वाळूही निसटते हळूहळू
स्वप्न राहिले तिथेच...लागते जेव्हा कळू
स्वप्नात आजकाल एकच पोर असते..
प्रत्येकवेळी नाव काही और असते
प्रेमकहाणी जगायला जातो तिथेच ती भंगते जणू
स्वप्नच असते हो..प्रेमात असा कीतीवेळा कण्हू..
खर आयुष्य जगतानाही स्वप्न पडतात
पण कधी कधी घटना स्वप्नासारख्या असतात
आयुष्य स्वप्न बनण्याआधी जगून घ्यावे बरे..
काय माहीत केव्हा ते स्वप्न होईल पुरे...
नशीब...वेळ....काळ....सगळच कसं लागतं
ह्या सगळ्यांच गणित ज्याला जमतं
एका स्वप्नात काय काय बघणार...
तरी सुद्धा काय करणार.....
आजकाल स्वप्न पण अपुरीच पडतात........
- शशांक नवलकर ११-५-२०१०.
Subscribe to:
Posts (Atom)