Wednesday, March 10, 2010

एक विचित्र स्वप्न..

एक शापित स्वप्न..
मला पडलेल....
आगळ वेगळ
असच काहीसं घडलेलं...
अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल
सारं काही विस्कटलेलं
पुन्हा उभं राहतय.....
माझं जगणं बदलतय
हळूहळू जगही बदलतय..
आता कळू लागलय
थोडं थोडं........

कोण कोणाचं का असतं
कस असतं.....कधी असतं..केव्हा असतं
एवढे सगळे प्रश्न का असतात...
त्याला उत्तर का नसतं
प्रश्नाला प्रश्न का असतो......
उत्तराला उत्तर का नसते.......
एवढे सगळे प्रश्न.....
अचानक सुटले !!!
नक्कीच स्वप्न असावं
तरी सुद्धा दिसतय सर्वकाही....
काहीसे धूसर....काहीसे स्पष्ट
कदाचित काहीतरी दिसावं

एक सावली.....
अपली आपलीशी वाटणारी?
जवळ येणारी दूर जाणारी.....
हवीहवीशी.......भांबावणारी.......
कोणीतरी असेल आपलं मानणारी...
एका सावलीवरून ती......दिसेल??
त्या सर्व प्रश्नांची उत्तरं......
ती देईल..........
म्हणजे ती माझी होईल???
असही होऊ शकते का ?
नक्कीच तेही एक स्वप्नच असेल......

अचानक........जाग आली........
आई विचारू लागली..
काय बडबडत होतास.......
मनात म्हंटल वाट लागली.....
त्या स्वप्नाला पण त्याच वेळी पडायच होतं
काहीच कळत नाही......
तरी सुद्धा....
स्वप्नाच्या नावाने....कोडचं होतं
माझ्या आयुष्याचं
सुटलेलं कोडं

शशांक नवलकर १०/३/२०१०