Saturday, September 15, 2007

मैत्रीण . .



जग मी माझे हरलो मी तिला हरलो

मी माझे सर्वस्व हरलो मी मज स्वत:ला हरलो

पण तू मला भेटलीस माझी सखी बनून

मला आता असे वाटते की कोणी तरी आहे मजसाठी


मला तिची कमी दूर करणारे कोणीच भेटत नाही

पण तू मला भेटलीस अन माझी best friend ची कमी दूर झाली

अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी मला समजू शकेल

अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी तू आहेस


आयुष्यातील अनेक रंगातून प्रेमाचा रंग उडाला

आयुष्य माझे जणू रंगहीन झाले

पण माझ्या मैत्रीचा रंग अजून तसाच आहे

कारण त्यामध्ये तुझ्या मैत्रीचा रंग मिसळलेला आहे


मी माझ्या आयुष्याकडून कधीच कसली अपेक्षा केली नाही

मी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही

पण देवाने मला पहिल्यांदाच काही न मागता मला दिले

तूझ्यासारखी मैत्रीण त्याने मला दिली


माझी ह्या देवाकडे प्रार्थना आहे

तिची मैत्री मला कायम लाभावी

माझी मैत्री तिला कायम लाभावी

तूझी न माझी friendship अशीच अतूट राहावी


- ur best friend (शशांक)