Wednesday, August 29, 2007

ज्योत


ती जळत असते

ती जळवत असते
ती प्रखर असते

ती अस्थिर असते


ती जळत असते

तीला जळत ठेवणारे सुद्धा जळत असतात

जे तीला जळत ठेवतात

त्यांना जळण्यातच मजा येत असते


ज्योत ही प्रत्येकाच्या अंत:करणात असते

ज्योत ही प्रत्येकाच्या घराघरात असते

ती अंधार दूर करण्याकरीता नसते

अंधारात उजेडाची सोबत म्हणून साथ देत असते


ज्योत ही समईतून उजळते

कधी एखाद्या कंदिलातून

कधी कधी मशालेतून सुद्धा

अन जर नाही़च दिसली तर lighter आहे़च की


ज्योत दिसते सणा-सणांत सण साजरे करता

ज्योत दिसते म्रुत्यु मयतेत शोक करताना

ज्योत ही कधीच मोठी नसते

प्रत्येक ज्योतीचे प्रत्येक ठिकाणी तेवढेच महत्व असते


तीच ज्योत नवीन सुरुवात करताना पेटते

तीच ज्योत नवीन cigarate पेटवताना दिसते

घरा-घरांत अंधार पसरला की दिसते

जशी नवीन सुरुवात करताना ज्योत पेटवली जाते

तशीच मरणास सुद्धा ती तेवत ठेवली जाते


ज्योत ही अखंड नसते

ती विझली नाही तर ती दुर्मिळ असते

म्हणून ज्योत विझते

ती जर विझली तर......


ती विझली तर काहीच होत नाही

पुन्हा कोणीतरी येउन ती पुन्हा पेटवते ....

Thursday, August 9, 2007

आयुष्यात पुढे सरकत राहा .......


मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते

मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते

अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात

अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात


हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा

साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची

पण जेव्हा तो हात नकोसा होतो

तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची


नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते

तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण

तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण


आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर

अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर

जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच

नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे


आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग

अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता

अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात

असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो


खचू नका असे प्रसंग येता जाता

भय नामक राक्षसाला तारणारे

आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा


आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा ...