Thursday, January 31, 2008

मुक्याची कविता....


अनेक जण तेव्हा गप्पा मारत होते
एकमेकांच्या चर्चेत सर्व जण रमले होते
लपून छपून तो त्यांच्याकडे पाहत होता
आज त्याला सुद्धा काही बोलावेसे वाटत होते

पण हा तर त्याच्या नशीबाचा खेळ होता कारण तो मुका होता

प्रत्येक प्रेमी आपल्या प्रेयसीला i lov u म्हणताना
आपल्या ह्र्दयातील प्रत्येक ओळ वाचून दाखवताना
तो सर्व काही प्रत्यक्ष पाहत होता पण त्याला राहावत नव्हते
त्याला सुद्धा बोलायचे होते मोकळेपणाने बोलायचे होते

पण हा काळ त्याचा नव्हता...मन त्याचे बोलत होते पण तो... मुका होता

शब्द त्याचे अडखळले होते कधीच उमटणारे नव्हते त्या मुखावर
देवानीच त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता
जणू त्याच्या हालचालींचा खेळ तो बघत होता
अश्रूंना त्याचा नव्हती सीमा कारण त्याला काहीतरी सांगायचे होते

काळ आज का थांबत नव्हता त्याची हाक ऐकत नव्हता... कारण...तो मुका होता...

नाही त्याच्या सुखांची कोणाला परवा
नाही त्याच्या अश्रुंची कोणाला जाण
एकटाच होता तो अबोला ज्याला कोणीच जाणू शकले नाही
देवच ऐकत होता का त्याची हाक त्याला तो जणू बोलवत होता

शेवटी तो काही न बोलताच निघून गेला... पण काहीतरी नक्की सांगून गेला....

सुगंधाचे अस्तित्व



वाय्रामधे दरवळती तो सुगंध
शोधती तो गंध चोहीकडे
जीव नेई मज त्या सुगंधाकडे
शोधतो आहे आज मी त्या सुगंधाचे अस्तित्व

गडद धुके पसरले आज
वेड लावी जीवा तो सुगंध
ही वेडी ओढ मज नेई इथे तिथे
मन माझे आज शोधते आहे ह्या सुगंधाचे अस्तित्व

धुक्यातुनी प्रकाशातुनी दरवळती तो सुगंध
प्रफुल्लित होई प्रत्येक मर्मबंध
आहे तो सुवास जणू निशिगंध
मन माझे करती विरक्त हे सुगंधी अस्तित्व

सुंगंधात दरवळला रंग प्रेमाचा
रंगात रंग होता सावल्यांचा
सावल्यांनी नेले मला त्या निशिगंधाकडे
कोणीच नाही सांगू शकले मला त्या सुंगधाचे अस्तित्व

मी आज शोधतो आहे कुठे आहे या सुगंधाचे अस्तित्व
माझ्या मनात माझ्या ह्र्दयात विचारात दरवळती या सुगंधाचे अस्तित्व

Sunday, January 27, 2008

शेवटचे शब्द....


खूप शब्द आले-गेले माझ्या मनातून
विरह दु:ख यातना अंधार यांनी विरक्त केले
त्या कोरड्या शब्दांनी मन व्याकूळ अन पोकळ केले
पण आज मला लिहायचे आहेत शेवटचे शब्द...

शेवटचे शब्द त्या दु:खांसाठी.. शेवटचे शब्द त्या निर्जीव भावनांसाठी

खूप कागद खरडले त्या शब्दांनी आज
मन माझे खरडले त्या भावनांनी आज
आता करायची आहे त्या शब्दांची खरडपट्टी
नाही गरज आज त्या भावनांची त्या एकट्या शब्दांची

म्हणूनच शेवटचे शब्द त्या एकटेपणासाठी.. शेवटचे शब्द त्या एकट्या शब्दांसाठी

आज कंटाळ आला त्या अंधाराचा जगतो आहे प्रकाशात मी
विसरायचे आहे मला त्या अंधाराला ओढ आहे त्या प्रकाशाची
नको आज मला कोणाकडून कसलीही उत्तरं कशाचीही कारणं
सापडत आहेत आज मला त्या प्रश्नांची उत्तरं अपो-आप

शेवटचे शब्द त्या काळोखात... विझणाय्रा अंधारासाठी...उजळणाय्रा प्रकाशासाठी

खूप वाट पाहत होतो मी तीची.... विचार करता करता मागे पडलो मी
नाही पहायची यापुढे वाट जगावे आयुष्य सुखानी मौज मस्तीनं
नाही करावी कसली खंत नाही हवे आहेत ते अश्रू ती दु:ख
लिहावे आज खूप काही नाविन्यावर उजळत्या प्रकाशावर उल्हासित भावनांवर

लिहितो आहे मी शेवटचे शब्द त्या पोकळ शब्दांसाठी त्या रिकाम्या भावनांसाठी
पुन्हा न व्हावे माझे मन विरक्त त्या शब्दांसाठी विसरतो मी आज हे शेवटचे शब्द

Saturday, January 26, 2008

काटे काळजात घुसले



मन माझे तुझ्यात रुतले
प्रेम मी फक्त तुझ्यावर केले
काय कमी मी तुझ्यासाठी केले?
का तुझ्या दु:खाचे काटे काळजात घुसले?

रक्त माझे सांडले होते तुझ्या प्रेमात
रक्तबंबाळ झाले ह्र्दय तुझ्या प्रेमात
का केलेस असे प्रिये होतो मी तुझ्या खूप प्रेमात
धोक्याचे हे धुके पसरले का हे काटे काळजात घुसले?

काटे जेव्हा रुपतात शरीरात मनात ह्र्दयात
वेदना होती असह्य वाहूनी येई ते फक्त रक्त
का आज तुझ्या आठवणींसाठी माझे रक्त वाहते
त्या वेदनासाठीच का हे काटे काळजात घुसले

तू आज मला वेदना दिल्यास प्रिये
माझ्या प्रेमाचा आज धडा दिलास प्रिये
आज हे काळीज झाले आहे रक्तबंबाळ
थांबव प्रिये हा तुझा खेळ सावल्यांचा

आज तुझे दु:ख माझे अश्रू वाहूनी नेले
तू माझे प्रेम सर्व काही निघून गेले
का केला होता तू माझा हा असा घात
तू दिलेल्या आठवणीच जणू हे काटे... जे आज मज काळजात घुसले

Wednesday, January 23, 2008

रक्तबंबाळ ....


अनेक घडले अनेक घडते आज अवतीभवती
कोणी का प्रकाश दाखवी दाही तिथे अंधार
मनुष्य आज असा का होतो लंपट अन लाचार
त्याचमुळे आज जग हे होते का रक्तबंबाळ...

अनेक घटना घडत राहतात नाही त्यांना अंत
लोकच त्यांना कारण ठरतात ते असतात संथ
जिव्हाळा ज्यांच्या अंगी असतो ठेचले तेच जातात
त्यांच्याच रक्ताने हे जग माखते व होते ते रक्तबंबाळ...

लाज लज्ज्या वाहून नेते अनेक लोकांचे रक्त
खूप राक्षस आपल्यातच असतात पिणारे तेच रक्त
ठेचा त्यांना आज तुम्ही तुमचा वर्तमान बनून
नका सांडू ते निर्दोश होऊ नका रक्तबंबाळ...

गुलाब देता तुम्ही लाल पण तेच हात रक्ताने माखतात
ती तुम्हाला दु:ख देते होता तुम्ही का घायाळ
प्रेम जर करता तुम्ही अमाप नका होऊ प्रेमात पसार
नका करू तुम्ही तुमच्या ह्ह्र्दयाला विनाकारण रक्तबंबाळ....


करा विशुद्ध तुम्ही आज तुमचे आणि आमचे रक्त
नका होऊ देऊ पुन्हा ह्या जगाला तुमच्याच रक्ताने रक्तबंबाळ

तुझी खूप आठवण येते



प्रेमात तुझ्या पडलो मी
जिथे दिसे तुच दिसे
प्रेमाने मज केले आज वेडे
वेडे ये ना मजकडे कुठे आहेस तू
आज मला तूझी खूप आठवण येते

त्या वेळी तो क्षण मी कधीच नाही विसरणार
तू होतीस तिथे मी होतो इथे
तूझ्या ओठांतूनि आले ते स्वर
त्या शब्दांनी मज केले वेडे आज
म्हणूनच मला आज तूझी खूप आठवण येते

आज मला एकटे नाही राहावत
कारण सगळीकडे तूच असतेस जेव्हा मी एकटा असतो
क्षणाक्षणांत तू असतेस शब्दा-शब्दांत तू असतेस
आज माझ्या प्रत्येक गोष्टीत तू असतेस माझ्या मनात.. माझ्या ह्र्दयात...
म्हणूनच प्रिये आज मला तूझी खूप आठवण येते

आज मला नाही कोणाची गरज
जिथे तू आहेस तिथे सर्व काही आहे
पण आज तू नाहीस माझ्याकडे
तू नाहीस तर काहीच नाही ... पण तू आहेस मजसाठी तिथे

हो प्रिये म्हणूनच आज मला तूझी खूप आठवण येते

Tuesday, January 22, 2008

खेळ सावल्यांचा ....



ह्या सावल्यांच्या खेळात शोधतो मी तूला
कधी मनामध्ये कधी ह्र्दयामध्ये लपंडाव तुझा
प्रेमाचा गंध दरवळती तुझा इथे तिथे सर्वत्र
ह्या सावल्यांच्या खेळात हरवलो आहे मी आज

थांबव ना प्रिये आज हा खेळ सावल्यांचा

मनात माझ्या पडले आहे तुझ्या विचारांचे चक्र
ह्रदयात माझ्या पडले आहे तुझ्या प्रेमाचे चक्र
सर्वत्र जणू अनेक चक्रव्यूहच चालत आहेत
कधी प्रेम कधी विरह कधी कलह कधी संथ

चक्रव्यूहात असा फसलो मी आज ... असाच हा खेळ सावल्यांचा

कधी हसते कधी रुसते पण ती तिथे नसते
तिला मी शोधत असतो चोहीकडे पण ती कुठेच नसते
तिची वाट पाहत असतो मी रोज पण ती कुठेच नसते
पण येते ती माझ्या समोर हळूच गालात हसते

पण जवळ जातो तेव्हा तिची सावलीच असते.... असा का हा खेळ सावल्यांचा

आज मी ह्या सावल्यांमध्ये गुरफटून गेलो
त्या दु:खांमध्धे मी आज फरफटून गेलो
पण हया चक्रव्यूहातून मी येईन बाहेर कधीतरी
जेव्हा असेल ती मजकडे व तिला घेऊन जाईन कधीतरी

पण आज ती मजकडे नाही .... का असा आहे हा खेळ सावल्यांचा

Wednesday, January 16, 2008

तिथे फक्त तूच आहेस .....


आजचा दिवस काही नेहमीसारखा नव्हता
एकटेपण नव्हते एकटे श्वास नव्हते
आजसुद्धा माझे जगणे नेहमीसारखे नव्हते
आज पाहतो तिथे तू आहेस डोळे मिटतो तिथे तू आहेस ...

आज मला कसलेही विचार नाहीत नाही तो विरह
गर्दीतसुद्धा मी एकटा आहे पण सर्वत्र तू तिथे आहेस...
आज माझ्याशी तू सावल्यांचा खेळ खेळत आहेस
पण तू लपू नाही शकत माझ्या सावलीत सुद्ध तिथे तूच आहेस...

किनारा समुद्र बाग सगळीकडे तू आहेस
माझे ह्र्दय माझे विचार माझे श्वास इथेसुद्धा तूच आहेस
प्रेमात पडलो मी आहे आज तुझ्या क्षणाक्षणांत तू आहेस
जिथे जिथे मी जातो हसू येते आज मला कारण सर्वत्र माझ्यासाठी आज तिथे तूच आहेस...

आज मी ती दु:ख विसरतोय आज आनंदी होतोय
सगळ्याची आज मला वाटते मजा न्यारी तिचा आस्वाद देणारी तूच आहेस
प्रेमात पडल्यावर हात तुझाच थांबतो मी माझा हात धरणारी तूच आहेस
आज जिथे जिथे जातो मी चुकल्यास मज थांबवणारी फक्त तूच आहेस

कोण आहेस तू ? शोधू कुठे तुला मी ?
आज हवा आहे तो एक क्षण ...
व्हावी पुन्हा तुझी ती एक भेट...
आज मी तूला विचारतो तू माझी होशील का?

मज आज उत्तरणारी तूच आहेस
हो तू माझी आहेस कारण आज माझ्या आयुष्यात....
सर्वत्र तिथे फक्त तूच आहेस .....

Monday, January 14, 2008

कायापालट ...


काळ बदलला जग बदलले
समाज बदलला प्रत्येक जण बदलला
सर्व काही कसे बदलत होते
का होतो हा प्रत्येकाचा कायापालट

माणूस अनेक वेळा चूक करतो
त्या चूका दुरूस्त करतो
पुन्हा नवीन चूका करतो
पण तो पुन्हा न चुकता सुधारणाच करीत जातो

तेव्हा होतो त्या माणसाचा होतो कायापालट

मुलगी मोठी होते कन्या होते स्त्री होते
प्रसंग ऐकते प्रसंग बघते प्रसंग अनुभवते..
पण पुन्हा कधी अतिप्रसंग घडला तर सामोरी जाते
जेव्हा येतो तिच्यावर असा प्रसंग तेव्हा होते ती खंबीर

जेव्हा स्त्री सामोरी जाऊ शकते कोणत्याही प्रसंगी तेव्हा होतो तिचा कायापालट

आज हे जग हादरले भेदरले
वादळ सहन केले प्रकोप सहन केला
पण कधीच डगमगले नाहीत ह्या जगातील लोक
प्रत्येकाचा हात थांबून ते येइ तो प्रसंग सोसत होते सहत होते

त्यांनी कधीच सोडली नाही ती उमेद ते करत गेले त्यांचा कायापालट

काहींनी नाही होऊ दिला कोणावर अन्याय
काहींनी अंध-मुकपणे सहन केला अन्याय
पण ज्यानी धरला स्वत:मध्ये आत्मविश्वास
त्यांना जमले आहे आज हे जग बदलण्याचे सामर्थ्य

हो त्यांनाच आज जमले आहे करणे ह्या जगाचा कायापालट

का नाही तुम्ही सुद्धा करत तुमच्या प्रतिमेचा कायापालट
का नाही तुम्ही सुद्धा करत तुमच्या आत्म्याचा कायापालट
मी सुद्धा करीन माझ्या नशीबाचा कायापालट माझ्या आयुष्याचा कायापालट
कराल का तुम्ही तुमचा असा हा कायापालट .....

Saturday, January 12, 2008

एकटाच ती वाट चालून निघून आलो....


दु:ख विरह निराशा अपेक्षाभंग सर्व काही सोसले
डॊळ्यातले पाणी आटले रक्तांचे अश्रू निघून आले
विसरून जायचे होते मला सर्व काही पण ते नाही जमले
तीची सावली सुटली नाही तिनेच माझे सर्व काही नेल....

म्हणूऩच मी आज एकटाच ती वाट चालून निघून आलो

प्रेम करायचे प्रेयसीवर तिचा धोका सहन करायचा
हे प्रेमीस असह्य होई जेव्हा जावा त्याचा तोल
नशा तलब बाई लवाजमा जवळ करायचा त्याने
सहन करावा त्याचा हा त्रास त्त्याच्या प्रत्येक आपल्याने

नको झाली ती व्यसने नको झाले सर्व काही ....
म्हणूनच का ती मी वाट चालून निघून आलो

आज मजकडे उरले नव्हते काही
न होते मजकडे कोणी आपले म्हणावेसे
जग होते मज अवतीभोवती पण होतो मी त्या जगात एकटाच
कोणी नव्हते माझी साथ देणारे मला कोणी थांबवणारे

मी मात्र चालतच होतो .... वीट आला त्या एकटेपणाचा त्या दु:खांचा
म्हणूनच आज एकटाच ती वाट चालून निघून आलो

Wednesday, January 9, 2008

शेकोटी आणि आग



आज तीच थंडी तीच गर्मी मला आठवते
तीच आग त्याच आठवणी तीच मजा आठवते
जितकी प्रखर जळत होती त्या शेकोटीची आग
आज प्रत्येकाचे आयुष्यसुद्धा असेच जळत असते

आयुष्याचा दिवा झळकला प्रज्वलित झाला
तो दिवा न विझणारा झाली त्याची मशाल
आज पेटली आहेत अनेक जगं पेटले आहे प्रत्येकाचे आयुष्य
उरला होता तो फक्त काळासर धूर अंधरात पसरलेला
राहीली होती फक्त राख व विझली होती प्रत्येकाच्या आयुष्याची शेकोटी..

त्याच आगीत विझल्या अनेक रात्री
त्याच रात्रीत पेटली होती ती आग एकदाच
जणू ती आग विझणारच नव्हती
पण त्या आगीचा अंत होता होता ती बनली त्यांच्य आयुष्याची शेकोटी...

ह्या शेकोटीमध्ये जळली अनेक प्रकारची आग
अनेकांनीच पेटवली होती ती आग अन त्यांचीच झाली होती राख
ती आग होती प्रेमभंगाची,अंधविश्वासाची अन प्रत्येकाचा शेवट करणारी
पण हळूच कोणीतरी पेटवली होती एक नवीन आग
ती आग होती प्रत्येकासाठी एक नव्या आत्मविश्वासाची

शेकोटी जळली फक्त त्या रात्रीपुरतीच
ज्यांनी त्यांची उब घेतली त्यांनाच कळली तीची मजा
जे त्या शेकोटीनेच आग पेटवायला गेले त्यांचीच झाली राख
पण ह्या आयुष्याची ही शेकोटी कधी विझलीच नाही

जळत होते सर्व काही होणार आहे प्रत्येकाची राख
पण आयुष्याची ही आग कधीच विझणार नाही
कोणीनाकोणी ती शेकोटी पेटवतच राहणार

नाती जुळता ...जुळवता



आज अनेकाशी संबध जुळले
काही जणांशीच नाती जुळली
काहींनी विश्वास ठेवला आणि राखला
काहींनी तो तोडला आणि दग दिला

आज राहीली फक्त ती नातीच... पण त्यात विश्वास नव्हता..

जेव्हा कधी मी कधी कोणाशी बोलावे
तेव्हा प्रत्येकाने आपुलकीने जवळ यावे
कधी कधी त्याने स्वत:हून हात पुढे करावा
पण मी चुकलो होतो जेव्हा त्यांनीच तो हात फिरवला

तेव्हा मजकडे नव्हते कोणी... त्यात माझा हात एकटाच होता

जिच्यावर मी केले जिवापाड प्रेम
तीच आज दुसय्राचा हात धरून निघून गेली
पण आज नक्कीच आहे कोणीतरी माझ्यासारखे एकटे
ज्याच्याशी किंवा जिच्याशी मी माझी दु:ख व्यक्त करेन

आज माझ्याकडे नाही आहे कोणी... पण आज मी एकटा नाही आहे

जुळवली होती मी मित्रांशी अनेक नाती
काही तुटली तर काही जपली गेली
त्या आठवणी तिथेच थांबल्या जेव्हा ते दूर गेले
पण त्या आठवणी पुसल्या नाहीत कारण ते अजूनही ह्र्दयातून गेले नाहीत

प्रेम मैत्री मौज मजा सर्व काही होते.. पण त्यात नव्हते कोणाशीच नाते
असेच माझ्या आयुष्यात का घडले... तुकडे का झाले होते माझ्या ह्र्दयाचे

Wednesday, January 2, 2008

माझी पहीली कविता



कवितांसाठी मज स्वत:साठी
तिच्या असण्यासाठी तिच्या नसण्यासाठी
हातात धरली होती मी लेखणी
शब्दच जणू मज मनात नाच करीत होते

उसळला त्या शब्दांचा नाद आणि मी लिहिली माझी पहीली कविता

कविता करायची होती प्रेयसीसाठी
कविता करायची होती माझ्याच दु:खान्साठी
कविता करायची होती सर्व सर्वांसाठी
शब्दच माझे बोलणार होते माझ्या ओळींतून

तेव्हाच धरला मी मज श्वास आणि लिहिली मी माझी पहिली कविता

ती मला सोडून गेली ह्याला उत्तर नाही
मी आज एकटा का पडलो ह्याला उत्तर नाही
प्रेमात पडलो मलाच मी हरलो ह्याला उत्तर नाही
प्रेम केले मी तिच्यावर जिवापाड पण तिचेही मला उत्तर नाही

सावरले मी मज स्वत:ला डोळे उघडले माझे आज आणि लिहिली मी माझी पहीली कविता

थोर असा मी कोणीच नाही
महानता गाजवू असे मजकडे काहीच नाही
प्रेमात पडलो मी त्या कवितेच्या तिच्या ओळींच्या
पण मला ती कविता कधी भेटलीच नाही

एका किनयावर उभा राहून पाहतो मी तिची वाट
आणि करतो मी माझी पहीली कविता ......

कविता तिच्या आठवणीनसाठी
कविता त्या वेदानांसाठी
कविता त्या प्रत्येक हासयासाठी
कविता त्या प्रत्येक आनंद क्षणासाठी

म्हणूनच एका नव्या उमेदीची वाट पाहून लीहितो मी आज ...
माझी पहिली कविता ....